“साहित्य तारांगण”- साहित्य वाचन प्रकल्प
“साहित्य तारांगण”- साहित्य वाचन प्रकल्प
“साहित्य तारांगण”- साहित्य वाचन प्रकल्प
“साहित्य तारांगण”- साहित्य वाचन प्रकल्प
When | 30 January 2022 |
Time | 16:00 |
Location | Zoom |
Spaces left | 67 |
Registration is closed
नमस्कार मंडळी,
मागील वर्षात महाराष्ट्र मंडळ सिंगापूरने अनेक उपक्रम राबवले, सर्वच उपक्रमांना आपण भरभरून प्रतिसाद दिलात, “नभ उतरू आलं” च्या रूपाने आपण सलग ५० दिवस पाऊस या विषयावर संगीत आणि नृत्याचा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या राबवला. याच धर्तीवर आम्हाला आपल्यापैकी अनेकांनी आणखी एक असाच उपक्रम करता येईल का? यासंबंधी विचारणा केली.
आपला उत्साह पाहून, मंडळाने नवीन वर्षात एक नवा ऑनलाईन उपक्रम करण्याचे ठरवले आहे. “साहित्य तारांगण” असे या उपक्रमाचे नाव आहे. मराठी साहित्य हा मराठी माणसाचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. मग ते पुस्तक विकत घेणे असो, किंवा पुस्तकांविषयी चर्चा असो आपण कायमच त्यात रस घेत आलो आहोत. अगदी मराठी साहित्य संमेलनांना देखील उदंड प्रतिसाद मिळतो. अशा मराठी रसिकांसाठी महाराष्ट्र मंडळ सिंगापूर घेऊन येत आहे एक सुवर्णसंधी. आपल्या आवडत्या आणि प्रसिद्ध कवी/लेखकांचे साहित्य आपल्याला वाचायचे आहे.
या उपक्रमाविषयी थोडक्यात
मंडळी, प्रथम नोंदणी करणाऱ्यांस प्राधान्य आणि व्हिडिओ ची गुणवत्ता या निकषांवर व्हिडीओ स्वीकारण्यात येतील. तेव्हा आपल्या आवडत्या साहित्यिकाची निवड त्वरित करावी ही विनंती.
सोबत दिलेल्या लिंक वरून नावनोंदणी आणि साहित्यिकांची निवड करावी. आपले साहित्य वाचनाचे व्हिडीओ मंडळाच्या युट्युब चॅनेल वरून प्रसारित केले जातील.